बॉलिवूडमधील ग्रुपीझमवर पहिल्यांदाच बोलले सचिन पिळगावकर, जाणून घ्या
By Ms Moon
on
सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा वाद सुरु झाला आहे. बॉलिवूडमधील इनसाईडर्स आणि आऊटसाईडर्स यांच्यातील वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एका वेबपोर्टलशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. सचिन म्हणतात, ‘इंडस्ट्रीमध्ये सतत बदल होतच असतात. ते चांगलेही असू शकतात किंवा बादही असू शकतात.
आपण सगळेच यातून जात असतो. मी बालकलाकार म्हणून सुरुवात केली नंतर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून रुळलो. प्रत्येकाचे वाईट आणि चांगले दिवस येत जातात. जगाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास सगळेजण त्यांच्या जागी योग्य आहेत. आधी मी माझ्या सिनिअर्स कडून शिकायचो. आता माझ्या जुनिअर्सकडून शिकतो.’
Read More