चाहत्यांच्या तिरकस प्रश्नाला अंकिता कोनवारचं मजेशीर उत्तर

By  
on  

सुपर मॉडेल मिलिंद सोमण अनेकदा चर्चेत असतो. कधी पत्नी आणि त्याच्या वयातील अंतरामुळे तर कधी त्याच्या फिटनेस प्रेमामुळे. पण सध्या मिलिंदची पत्नी अंकिता चर्चेत आहे. अंकिता इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. त्यावेळी एका चाहत्याने तिला ‘तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा प्रश्न विचारला. 

 

यावर तिच्या उत्तराची चर्चा सर्वत्र आहे. या प्रश्नावर अंकिता म्हणते, ‘आम्ही एक प्लॅन फॉमिली आहोत’ हे उत्तर अंकिताने दिलं आहे. अंकिता आणि मिलिंदमध्ये २६ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल देखील केलं जातं.

Read More
Tags
Loading...

Recommended