शिल्पा शेट्टीची मागणी हायकोर्टाने फेटाळली, वृत्तांकनास मनाई केल्यास प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा

By  
on  

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीलासुध्दा अनेक अडचणींना  सामोरं जावं लागत आहे. मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेली मागणी मान्य करून प्रसिद्धीमाध्यमांना वृत्तांकन करण्यापासून सरसरकट मज्जाव केला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.

पत्रकारिता ही अभिव्यक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे चागंली आणि वाईट पत्रकारिता कशाला म्हणावे याबाबत न्यायालयालाही मर्यादा आहेत, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले. 

अश्लिल चित्रपट निर्मितीप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून प्रसिद्धीमाध्यमांकडून आणि सोशल मिडीयावर आपल्याविरोधात मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केली जात असल्याचा आरोप शिल्पाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  प्रतिमा मलिन करण्याचा आरोप शिल्पाने केला होता. 

Read More
Tags
Loading...

Recommended