लडाखमधील सर्वात उंच ठिकाणी प्रदर्शित झाला अक्षय कुमारचा सिनेमा ‘बेलबॉटम’

By  
on  

19 ऑगस्टला अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ सिनेमा देशभरात रिलीज झाला. या सिनेमाने आतापर्यंत 8 कोटीपर्यंत कमाई केली आहे. करोनाकाळात रिलीज झालेला हा मोठा सिनेमा आहे. अक्षयने आपल्या अकाउंटवरुन ही बाब शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘माझा मन अभिमानान भरुन गेलं आहे. की बेलबॉटमला लडाखमधील जगातील सगळ्यात उंचीवर असलेल्या मोबाईल थिएटरवर दाखवलं गेलं.

 

 

11562 फुट उंचावर आणि -28 डिग्री सेल्सियस तापमानात थिएटर असणं खरच अद्भुत आहे. हा सिनेमा सामान्य जनतेसोबतच सैन्य अधिका-यांसाठी प्रसिद्ध केला गेला.  'बेल बॉटम' ची निर्मिती पूजा एन्टरटेन्मेंट ने केली असून रंजीत तिवारी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशीही आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended