अंकिता लोखंडेसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट, म्हणते "तू प्रत्येक मिनिटाला मला आश्चर्यचकित करते"

By  
on  

'पवित्र रिश्ता' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आजही प्रेक्षक या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेतून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हे कलाकार लोकप्रिय ठरले होते. मात्र आता एकता कपूर या मालिकेचं दुसरं पर्व घेऊन आलीय. 'पवित्र रिश्ता 2.0' मधून पुन्हा एकदा ही अनोखी प्रेम कहाणी वेगळ्या रुपात पाहायला मिळेल. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता या मालिकेत मानवची भूमिका हा अभिनेता शाहीर शेख साकारतोय. 

अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील या दुसऱ्या पर्वात महत्त्वाची भूमिका साकारतेय. मालिकेतील कलाकारांसोबत अभिज्ञा चांगलीच रमलीय. विशेषकरून तिची अंकिता लोखंडेसोबत खास मैत्री झालीय. म्हणूनच तिने अंकितासाठी सोशल मिडीयावर पोस्ट शेयर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

 

अभिज्ञा लिहीते की, "तू जशी मुलगी आहेस त्यासाठी.. तू प्रत्येक मिनिटाला मला आश्चर्यचकित करते.. तुझी ऊर्जा, तुझं सदैव सुंंदर नृत्य ते तुझं ह्रदय हे सगळं हटके आहे. पवित्र रिश्ता 2.0 च्या निमित्ताने मला तुला जाणून घेण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. ह्रदयाने तू अर्चना आहेस, तू यासाठी तुझा आत्मा दिलास आणि मला खात्री आहे की तुझी मेहनत फळाला येईल. जे काही आपण ऑफस्क्रिन शेयर करतो ते रिल लाईफपेक्षा विरुद्ध आहे. मला तुझ्यासारख्या व्यक्तिची प्रचंड गरज होती. धन्यवाद तू मलाही तुझ्या या वेडेपणात सामील करुन घेतलस. मी हे म्हणू शकते की, खरी मैत्री कधी कधी जास्त वेळ घेत नाही. चल हे जलद झालेले बंध कायम बांधण्यासाठी या प्रवासाला सुरुवात करूयात. माझ्या अर्चनावर माझं प्रेम आहे."

अभिज्ञाच्या पोस्टमधून दोघांची किती चांगली मैत्री झालीय हे पाहायला मिळतय. या मालिकेच्या निमित्ताने दोघांची मैत्री बहरताना दिसतेय.
 

Read More
Tags
Loading...

Recommended