या अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, झाली सात लाख रुपयांची चोरी

By  
on  

अभिनेत्री निकिता रावल हिला नुकतंच एका अप्रिय घटनेला सामोरं जावं लागलं आहे. निकिताला दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही चोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटलं आहे. दिल्लीतील एका नातेवाईकांच्या घरी जाताना निकितासोबत हा प्रकार घडला आहे. 

 

रस्त्याने चालत जात असताना एक गाडी माझ्या आडवी येऊन उभी राहिली. त्यानंतर त्या गाडीतील काही लोकांनी बंदुकीचा धाक दाखवत माझ्याकडील सर्व वस्तू चोरल्या.” या चोरांनी निकिताकडील अंगठी, घड्याळ, कानातले, हिऱ्याचं पेंडेंट आणि काही रोख रक्कम चोरली. या संपूर्ण वस्तूंची किंमत जवळपास ७ लाख रुपये असल्याचं निकिताने सांगितलं आहे.

पुढे निकिता म्हणते, ‘हे लोक माझा रेप करतील किंवा मला ठार मारतील अशी मला सतत भिती वाटत होती. त्या दहा मिनिटांनी जणू मला एका शॉकमध्ये नेलं आहे. मी अजूनही ती घटना विसरु शकत नाही. मला अजूनही झोपदेखील लागत नाही. निकिता आगामी रोटी कपडा और रोमान्स’ मध्ये अर्शद वारसी आणि चंकी पांडे सोबत दिसणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended