टीप टीप बरसा पानी..गाण्यावर रितेश -जिनिलियाचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

By  
on  

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा सुखी संसार सुरु असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. दोघंही भन्नाट आहेत, याची प्रचिती वेळेवेळी सोशल मिडीयावर येते. 

रितेश आणि जिनिलिया मित्रांसोबत मस्त पोहायला गेले आहेत. तिथेच त्यांनी हा धम्माल व्हिडीओ शूट केला आहे. जिनिलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे .

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

यात ती आणि रितेश सोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शबीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल सोबत पाण्यात मसती करताना दिसत आहेत. यावेळस ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्यावर ते नाचत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘टीप टीप बरसा पानी’ असे कॅप्शनही तिने दिले आहे. हा व्हिडीओ तिच्या अकाऊंटवर शेअर होताच व्हायरल झाला आहे.  हजारोहुन अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळले आहेत. चाहते लाईक्सचा वर्षाव या व्हिडीओवर करतायत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

Read More
Tags
Loading...

Recommended