Birthday Special: बिग बींनी या अंदाजात स्वत:लाच शुभेच्छा दिल्या

By  
on  

अदाकारीचा जादुगार सिनेविश्वाचा महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. खरं तर अमिताभ आणि त्याच्या सिनेमांविषयी बोलण्या आणि लिहिण्यासाठी शब्द मर्यादेचं भान राहिलं नाही तर नवलच. अमिताभ वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्याने भेटले आहेत. आपलेसे वाटले आहेत, अभिनय त्यांनी जिवंत केला आहे. त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखा मनाला स्पर्शून गेल्या आहेत. त्यामुळेच लाडक्या नायकांच्या यादीत त्यांची जागा कायमच अग्रेसर राहिल.

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली. 

 

अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक हटके फोटो शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

 

अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एक हटके फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत ते म्हणतात,  “८० व्या वर्षाकडे” . 

तर ट्वीटरवर हा फोटो शेअर करतेवेळी “जेव्हा साठी (६०) तेव्हा पाठी आणि जेव्हा ऐंशी (८०) तेव्हा लस्सी!!! हे समजून घेणेही एक समज आहे,” असे अनोखे कॅप्शन दिले आहे.

बिग बींनी पोस्ट केलेल्या या पोस्टवर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव चाहते करतायत. 

Read More
Tags
Loading...

Recommended