'गुलाबो सिताबो' फेम अभिनेत्री फारुख जाफर यांचं 88 व्या वर्षी निधन

By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री  फारूख जाफर यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी काल 15 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. 1981मध्ये प्रदर्शित झालेल्या  'उमराव जान' या चित्रपटामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात रेखा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. यात त्या रेखा यांच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. 

'उमराव जान' चित्रपटानंतर तब्बल 23 वर्षांनंतर फारूख यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. स्वदेश, पीपली लाइव्ह, चक्रव्यूह, तनु वेड्स मनु आणि सुल्तान या चित्रपटांमध्ये फारूख जाफर यांनी भूमिका साकारल्या होत्या. 

यानंतर अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा स्टारर गुलाबो सिताबो या मागच्या वर्षी  ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिनेमात त्यांनी ल७वेधी भूमिका साकारली. 'गुलाबो सिताबो' या चित्रपटामध्ये फारूख जाफर यांनी फातिमा बेगम ही भूमिका साकारली. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended