अभिनेते पुनीत राजकुमार यांचं निधन, कन्नड सिनेसृष्टी शोकसागरात

By  
on  

कन्नड सिनेमातील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.  वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. 
दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने पुनीत यांना बंगळूरुमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती खालावत गेली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. 

 

 

पुनीत यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.  ‘बेट्टाडा हूवू’ सिनेमातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. पुनीत यांच्या निधनानंतर बॉलिवूड तसेच अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली  आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended