जिनिलिया देशमुखला तिचं वय विचाराताय ? मिळेल हे उत्तर

By  
on  

अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते.  आताही जिनिलियाच्या व्हिडियोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

या रिलमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती तिला ‘हॅलो’ असे म्हणतो. त्यानंतर तो विचारतो की “तुझे वय किती आहे?” यावर जिनिलिया म्हणते, ‘२२ वर्षे….’ त्यावर तो व्यक्ती म्हणतो…”२२ वर्षे, पाच वर्षांपूर्वीही तू २२ वर्षच वय सांगितले होतेस.”

त्यावर जिनिलिया थोडी गोंधळते पण पटकन गमतीत म्हणते, “बघितलं, आम्ही मुली किती एखाद्या गोष्टींवर ठाम असतो” आणि त्यानंतर ती आजूबाजूला बघताना दिसते. मुली या मनाने नेहमी तरुण असतात हे कॅप्शन तिने या व्हिडियोला दिलं आहे. या व्हिडियोतील जिनिलियाच्या निरागस अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended