Video : छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी सलमानने केलं असं काही, जिंकली अवघ्या महाराष्ट्राची मनं

By  
on  

सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे ती एका सिनेमाची ती म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. या सिनेमाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपट अनुभवण्याची आजच्या पिढीला संधी मिळणार आहे. 

आनंद दिघे यांचा, एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यासोबतच अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यासारखे दिग्गज कलाकारही यावेळी उपस्थित होते. धर्मवीरचा ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान सलमान खानने केलेली एक कृती सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

सलमान खान मंचावर आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघें यांच्या प्रतिमेला वंदन केलं. यावेळी सलमान खान देखील वंदन करण्यासाठी पुढे आला. यावेळी त्याने बुट घालते होते. पुढे येताच पायातील बुट काढू लागला. तेवढ्यात बाजूला असलेली एकनाथ शिंदे सलमान खानला बुट काढण्यापासून थांबवू लागले. पुढे सलमान खान बाजूला उभ्या असलेल्या रितेश देशमुखच्या कानात काही तरी बोलतांना दिसला. पण तेवढ्या रितेश देशमुख वंदन करण्यासाठी पुढे सरकला. तेव्हा स्वतःच मागे बाजूला सरकून सलमानने आपले बुट काढले आणि नंतर पुढे येऊन प्रतिमेला वंदन केले.

 

Read More
Tags
Loading...

Recommended