धर्म के लिए जिया हूं, धर्म के लिए मरुंगा...पाहा अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चा दमदार ट्रेलर

By  
on  

बहुचर्चित चित्रपट पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुख्य भूमिकेत अक्षय कुमार असून संजय दत्त सोनू सूद, मानुषी छिल्लर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

 २०१० साली चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली. परंतु त्यांना या चित्रपटासाठी निर्मातेच मिळत नव्हते. अखेर २०१८ मध्ये यश राज या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती करण्यास तयारी दाखवली. कोरोनामुळे या चित्रपटाची शूटिंग आणि प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. ३०० कोटी रुपये बजेट असलेला पृथ्वीराज आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अखेर ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended