'जीव माझा गुंतला'च्या सेटवर चित्राने केला गरमागरम कांदा आणि बटाटा भजीचा बेत

By  
on  

सगळीकडेच एका गोष्टीची चाहूल लागली आहे.... आपण सगळेच आतुरतेने वाट बघत आहोत आणि ती म्हणजे पाऊस कधी पडणार... पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो सगळ्यांनाच खूप आवडतो. आणि याचसोबत जर भजी आणि चहा मिळाला तर मग अजून काय हवं नाही का? पाऊस म्हंटल की बरेच काही बेत आपण आखत असतो. पण कलाकार मात्र दिवस रात्र शूटिंगमध्ये असतात.

मग अश्यावेळी सेटवरच जर कोणी पार्टीचा बेत आखला तर मग काय ...   कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेचे शूट कोल्हापूर येथे सुरू आहे. आणि शूट करत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, शूट थांबले... आणि हीच संधी साधून आपल्या सगळ्यांची लाडकी चित्रा म्हणजेच प्रतीक्षा मुणगेकर हिने सेटवर संपूर्ण युनिटसाठी बनवली कांदा आणि बटाटा भजी... सगळ्या कलाकारांनी आणि इतर सेटवरील युनिटने भजीचा आनंद गरम गरम चहा सोबत घेतला. चित्रा म्हणजेच प्रतीक्षाची सेटवर असे सरप्राईझ देण्याची ही पहिली वेळ नव्हे.

Read More
Tags
Loading...

Recommended