सलमान खान आणि वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र

By  
on  

बॉलिवूडसाठी एक खळबळजनक बातमी रविवारी समोर आली. हिंदी चित्रपट लेखक सलीम खान  वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे  रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यास गेले असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने धमकीचे निनावी पत्र दिले.  सलीम खान ज्या बाकावर बसले होते तेथे एक अनोळखी व्यक्ती आली आणि तिने एक निनावी पत्र त्यांच्या हाती दिले.  त्यात सलीम  आणि त्यांचा मुलगा सलमान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलीम यांनी आपल्या सुरक्षारक्षकामार्फत पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसानी सलीम यांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञान व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

मुंबई पोलिांसोबतच क्राईम ब्रांचसुध्दा या धमकीच्या पत्राचा छडा लावत आहे. तसंच सललमानच्या वांद्रे येथील घराची सुरक्षासुध्दा वाढवण्यात आली आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended