Video : वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांनी 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर पोहचण्यासठी मुंबई मेट्रोने केला प्रवास

By  
on  

वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर हे सध्या त्यांच्या फॅमिली एन्टरटेनर चित्रपट 'जुगजुग जिओ'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आज फिल्मसिटीमध्ये एका रियालिटी शोचे शूटिंग केल्यानंतर त्यांनी आणखी एका कॉमेडी शोमध्ये जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. 'जुगजुग जिओ'च्या कलाकारांनी गोरेगावमध्ये 'सुपरस्टार सिंगर २' चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना 'चला हवा येऊ द्या' या मराठी कार्यक्रमाच्या सेटला भेट देण्यासाठी दहिसरला पोहोचायचे होते. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आणि ट्रॅफिकचा फटका बसू नये म्हणून त्यांनी आपली वाहने सोडून मुंबई मेट्रोची मदत घेतली आणि चला हवा येऊ द्याचा सेट गाठला.

 

जुग जुग जिओ हा सिनेमा कौटुंबिक मनोरंजन करणारा असून या सिनेमात वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या बिघडत चाललेल्या नात्याची कहाणी सांगण्यात आली आहे. या सिनेमात कियारा आणि वरुण व्यतिरिक्त नीतू कपूर, अनिल कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

 

गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी जुग जुग जिओ या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. तसेच हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व जोहर यांनी संयुक्तपणे सिनेमातची निर्मिती केली आहे. 'जुग जुग जिओ' सिनेमा २४ जून २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended