रणबीर - आलियाने दिली गुडन्यूज ; लवकरच घरी हलणार पाळणा

By  
on  

बॉलिवूडचं सेलिब्रिटी कपल रणबीर-आलिया काही दिवसांपूर्वीचं लग्न बंधनात अडकले आणि आता लग्नानंतर काहीच दिवसांतचं त्यांनी गुडन्यूज देखील दिली आहे. आलिया भटने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर हँडल वरून एक फोटो पोस्ट करत, या फोटोला 'आमचं बाळ.. लवकरच येतंय', असं कॅप्शन देत ही खुशखबर शेयर केली आहे.

आलिया भट्टने थेट हॉस्पिटलमधल्या सोनोग्राफीरूममध्ये काढलेला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली आहे. आलियाने शेयर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीजनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

रणबीर-आलिया ५ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकले. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा थाटात पार पडला आणि लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातचं त्यांनी गुड न्यूज दिली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt

Read More
Tags
Loading...

Recommended