अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक

By  
on  

अभिनेता अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपातील फर्स्ट लुक व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून उलगडला. त्याच्या या फर्स्ट लुकने त्याने मनं जिंकली. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची चर्चा आहे. राज ठाकरेंनी या भूमिकेसाठी अक्षय कुमारचं नाव सुचवलं होतं. असं खुद्द अक्षयनेच या सिनेमाच्या घोषणेवेळी जाहीर केलं. त्यानंतर  त्याने राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत महाराजांच्या भूमिकेविषयी चर्चासुध्दा केली होती. 

पहिल्यांदाच अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिेकत झळकणार हे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.  ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील अक्षय कुमारचा छत्रपती शिवरायांच्या रुपातील लूक समोर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने एक ट्वीट केलं आहे. चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा फोटो पोस्ट करत अजय देवगणने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

 

“छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आवडते मराठा योद्धा आहेत. या महापुरुषाच्या सन्मानार्थ आणखी एक चित्रपट बनवला जात आहे, याबद्दल आनंद आहे” असं अजय देवगणने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने अक्षय कुमारलाही टॅग केलं आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended