Video : मन जिंकलंत तुम्ही अण्णा ! सुनिल शेट्टींवर नेटक-यांनी केला कौतुकाचा वर्षाव

By  
on  

अभिनेते सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल राहुल यांचा शाही विवाहसोहळा अलिकडेच खंडाळा येथे पार पडला. मोजके नातेवाईक व जवळचा मित्रपरिवार या विवाहसोहळ्याला उपस्थित होता. 

‘छोटेखानी समारंभात हा विवाहसोहळा संपन्न झाला. मी आता अधिकृतपणे सासरा झालो,’ अशा शब्दांत सुनील शेट्टी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करीत लेक आणि जावयाला आशीर्वाद दिले. शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाउसवर हा सोहळा पार पडला.

कडेकोट सुरक्षेत हा विवाह सोहळा रंगला. सोहळा पूर्ण होईपर्यंत ह्या सोहळ्याचे फोटो बाहेर येऊ नयेत याी उतर बॉलिवूड लग्नांप्रमाणेच खबरदारी घेण्यात आली होती. या सोहळ्यासाठी खास मुंबईहून फोटो-व्हिडीओ जर्नलिस्ट खंडाळ्यात दाखल होते. तेव्हा सुनिल शेट्टी यांनी स्वत: त्यांची भेट घेतली. 

फार्महाउसच्या जवळपासही कुणाला जाण्याची परवाणगी देण्यात आली नव्हती. मीडिया प्रतिनिधी आणि फोटोग्राफर्सं यांनाही फार्महाउसच्या जवळपास जाऊ दिलं जात नव्हतं, त्यांनाही काही अंतरावर थांबण्यात आलं होतं. असं असल्यानं लग्नाच्या आदल्या दिवशी सुनील शेट्टी यांनी काही मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधला होता. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी फोटोग्राफर्सं आणि मीडिया प्रतिनिधींशी मराठीतून बोलताना दिसत आहेत. फोटो ग्राफर्सं सुनील शेट्टी यांना सांगतात की, इथून काहीच दिसत नाही. त्यावर सुनील शेट्टी बोलतात की, इथं कोणीच नाहीय. उद्या मी सगळ्यांना घेऊन इथे येणार. मी माना, राहुल , अथिया सगळे इथे येऊ ...तेव्हा जे विचारायचं ते विचारा. असं सुनील शेट्टी बोलतात.

 

 

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी सुनील शेट्टी यांचं कौतुक केलं आहे. त्यांचं मराठीत बोलणं नेटकऱ्यांना खुप भावलं आहे. तर फोटो ग्राफर्सं यांच्यासोबत आपुलकीनं बोलल्याबद्दलही नेटकऱ्यांनी सुनील शेट्टींचं कौतुक केलय.

 

अण्णा मन जिंकलं तुम्ही, खुप प्रेमळ माणूस, तम्ही छान मराठी बोलता, हा माणूसच वेगळा आहे.... अशा शब्दांत नेटक-यांनी  सुनिल शेट्टी यांचं कौतक केवं आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended