‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्राप्त तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन

By  
on  

तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ अर्थात के. विश्वनाथ यांचे काल गुरुवार रात्री उशीरा निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. वृध्दापकाळाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.

२०१७ मध्ये के. विश्वनाथ यांना  ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन भारत सरकारने सन्मानित केलं होतं. त्यांना कला तपस्वी म्हणूनही ओळखलं जात होतं. ते तेलगू दिग्दर्शक असले, तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही तेवढीच मोठी भूमिका पार पाडली आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended