सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, समोर आले राजस्थान कनेक्शन

By  
on  

बॉलिवूड भाईजान सलमना खान काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देणारा एक इमेल आला होता. या बातमीने सर्वत्रच खळबळ उडाली होती. सलमान खानच्या सुरेक्षेतसुध्दा वाढ करण्यात आली होती. दरम्यान आता या प्रकरणाचे कनेक्शन आता राजस्थानमधील जोधपूरशी असल्याचे समोर आले आहे. सलमानला देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी जोधपूर पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांच्या संयुक्त पथकाने जोधपूरमधील रोहिचा कला या गावात राहणाऱ्या धाकडराम याला ताब्यात घेतले आहे. जोधपूर पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, जोधपूरमधील रहिवासी २१ वर्षीय धाकडराम याने अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज पाठवले होते. मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जोधपूरच्या लुणी पोलिसांना कळवण्यात आले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. यानंतर मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बजरंग जगताप यांनी त्यांच्या पथकासह लुणी पोलीस ठाणे गाठले आणि यानंतर दोन्ही पथकांनी मिळून आरोपींना अटक केली.

Read More
Tags
Loading...

Recommended