Exclusive: शेवटच्या घटका मोजताना ऋषी कपूर यांचा मन हेलावून टाकणारा फोटो
सिनेसृष्टीतील आणखी एक तारा निखळला! ऋषी कपूर यांच्या निधनामुळे एका महान कलाकाराला देश मुकला. ते सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिले. बालपणापासून ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात केली होती . पण आज अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली व सिनेसृष्टीला पोरकं करत ते निघून गेले. सकाळी ८.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली.
मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऋषी कपूर यांचा हा फोटो पाहून तुमचंही मन सुन्न होईल .ऋषी कपूर यांच्या निधनाचं वृत्त सर्वप्रथम सर्वांसमोर महानायक अमिताभ बच्चन यांनी आणलं. 'तो गेला..मी उध्द्वव्स्त झालोय,' अशा शब्दात त्यांनी आपल्या जिगरी दोस्ताच्या जाण्याची दु:खद वार्ता सर्वांपर्यंत पोहचवली.
सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या, माहितीनुसार बुधवारी रात्री उशीरा ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूरला आयसीयूमध्ये बोलावलं. त्यांच्या पलंगाशेजारी बसायला सांगितलं. तर पत्नी नितू कपूर या सतत ऋषी कपूर यांच्यासोबतच असायच्या. कोणालाही त्यांना भेटायची परवानगी डॉक्टरांनी दिली नव्हती. तर त्यांची लेक रिध्दीमा कपूर सहानी ही दिल्लीत वास्तव्यास असते. वडिलांच्या निधनानंतर ती मुंबईसाठी रवाना झाली आहे. पण त्यापूर्वीच ऋषीजींवर अंत्यसंस्कार पार पडले. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कारासाठी विलंब करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती.