विराट आणि अनुष्काच्या गोड बातमीवर अमूलने डूडलद्वारे केलं अभिनंदन!

By  
on  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही गोड बातमी विराटने सोशल मिडीयावरुन फोटोसकट शेअर करताच ती वा-यासारखी जगभर पसरली. सध्या हाच नेटक-यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. बेबी बंप फ्लॉंट करताना अनुष्का खुपच गोड दिसली. सर्वत्र या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना अमूलनेसुध्दा डूडल शेअर करत त्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

 "विरुष्का ऑन द वे! बटर बेटा किंवा मग बेटीसाठी " असं कॅप्शन देत अमूलने विराट आणि अनुष्काचं क्युट असं डूडलसुध्दा शेअर केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Amul Topical: Virat and Anushka are expecting!

A post shared by Amul - The Taste of India (@amul_india) on

 

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत गुड न्यूज दिली होती.

Read More
Tags
Loading...

Recommended