माधुरी दीक्षितने शेअर केली या सिनेमाची खास आठवण

By  
on  

माधुरी दीक्षितच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक म्हणजे ‘साजन’. या सिनेमातील लव्ह ट्रॅंगलने अनेकांची मनं जिंकली. यासोबतच सिनेमातील सुमधूर संगीताने त्याकाळी चार्टबस्टर मध्ये जागा बनवली.संजय दत्त, सलमान खान आणि माधुरीची या सिनेमात प्रमुख भूमिका होती. या सिनेमाला 29 वर्षं पुर्ण झाली आहेत. माधुरीने या सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘या सिनेमाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी लगेचच या सिनेमाचा भाग व्हायचं ठरवलं. ही कथा रोमॅंटिक होती. डायलॉग काव्यात्मक आणि संगीत सर्वोत्तम होतं. लॉरेन्स डिसुझा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 
तर सुधाकर बोकाडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. नदी-श्रवणने या सिनेमाला सुश्राव्य संगीत दिलं होतं.

Read More
Tags
Loading...

Recommended