‘नवरी मिळे नवऱ्याला’! सचिन-सुप्रिया यांचे दुर्मिळ Photos पाहा

By  
on  

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ही मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडी. आपल्या बहारदार अभिनयाने आणि अफलातून केमिस्ट्रीने या जोडीने मराठी सिनेसृष्टी गाजवली. 

ख-या आयुष्यातसुध्दा अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ही पती-पत्नीची जोडी कमाल आणि बेमिसाल आहे.

जवळजवळ 32 वर्षे ही जोडी अगदी आनंदाने संसार फुलवत आहे.ही जोडी अनेकांसाठी एक आदर्श आहे. 

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठीतील प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. 

या जोडीने 1985 मध्ये लग्नगाठ बांधली. सुप्रिया या केवळ 17 वर्षांच्या होत्या. तर सचिन 27 वर्षांचे होते. या दोघांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांचं अंतर आहे. 

या गोड जोडप्याला एक मुलगीसुद्धा आहे, ती म्हणजे श्रिया पिळगांवकर. तीसुध्दा आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत चमकते आहे. 

 

सुप्रिया यांच्या गालावर खूपचं सुंदर खळी पडते आणि त्यावरच सचिनजी भाळले होते. असं एका मुलाखतीत म्हटलं आहे. 

सिनेमांसोबतच या जोडीने नच बलिये हा प्रसिदध्द हिंदी डान्स  रिएलिटी शो नुसताच गाजवला नाही तर विजेतेपदही पटकावलं. 

 

आजही चाहते सचिन-सुप्रिया जोडीचे सर्व जुने-नवे सिनेमे आवर्जुन पाहतात.

Read More
Tags
Loading...

Recommended