Movie Review : डोक्याला लागेल विनोदाचा शॉट, पाहा आणि हसा खळखळून

By  
on  

‘डोक्याला शॉट’ हा शब्दप्रयोग अनेकदा वैताग आणणा-या किंवा कंटाळवाण्या बाबींसाठी वापरला जातो. पण या सिनेमाच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. कारण हा सिनेमा डोक्याला शॉट लावेल तो ही  विनोदाचा. हा सिनेमा तुम्हाला खळखळून हसवेल. अर्थात रोजच्या जगण्यातलं लॉजिक बाजूला ठेवलं तर...

दिग्दर्शक:  शिवकुमार पार्थसारथी

कलाकार:  सुव्रत जोशी,प्राजक्ता माळी,गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन

वेळ: २ तास  

रेटींग:  3 मून

कथानक अभिजीत,चंदू, भज्जी आणि गणेश हे चार जिवलग मित्र. अभिजीतचं (सुव्रत जोशी) सुब्बुलक्ष्मी (प्राजक्ता माळी)  या दाक्षिणात्य मुलीवर प्रेम असतं. येन केन प्रकारे तिच्या वडिलांचा होकार मिळवून आता या दोघांचं लग्न होणार असतं. लग्न दोन दिवसांवर आलं असतं. त्यादरम्यान हे चार मित्र क्रिकेट खेळायला जातात. भज्जीने मारलेला शॉट झेलण्यासाठी अभिजीत धावतो आणि झेल घेताना त्याचं डोकं एका दगडावर आपटतं आणि त्याचा स्मृतीभ्रंश होतो. स्मृतीभ्रंश झाल्याने अभिजीत आपलं सुब्बुवर प्रेम आहे तिच्याशी आपलं दोन दिवसांनी लग्न आहे हे पण विसरतो. अशा वेळी  काय करायचं हा मोठा प्रश्न अभिजीतच्या मित्रांसमोर आ वासून उभा राहतो. सुब्बु दाक्षिणात्य असल्याने अभिजीत तिच्याशी लग्न करण्यासही नकार देतो. मग सुरु होते खरी धमाल. अखेर अभिजीत सुब्बूशी लग्न करायला तयार होतो का ? त्याची स्मृती परत येते का? हे समजण्यासाठी हा सिनेमा पहावा लागेल.

दिग्दर्शन

शिवकुमार पार्थसारथी यांचा प्रयत्न चांगला आहे. पण हा सिनेमा अजून परिणामकारक होऊ शकला असता असं कुठंतरी वाटत राहतं. अभिनय कलाकारांचा अभिनय या सिनेमाची जेमेची बाजू म्हणता येईल. प्राजक्ता माळीनेही दाक्षिणात्य मुलीची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. मुळात तिच्या वाट्याला काम फार नाहीये. चार मित्रांचं विनोदाचं टायमिंगही उत्तम आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended