प्रेक्षकांची लाडकी मालिका 'आई कुठे काय करते'ने गाठला 200 भागांचा टप्पा

By  
on  

तुमच्या आमच्या घरातल्या वात्सल्यमूर्ती आईची तंतोतंत छबी छोट्या पडद्यावर मांडणारी मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' ह्या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, मालिकेच्या  प्रत्येक भागांची नेहमीच उत्सुकता असते.. आजी-आजोबा, नातवंडं, आई-बाबा असा भरलेला परिपूर्ण परिवार पाहणं म्हणजे एक सोहळाच ठरतो.

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी आता सर्वांनाच कळलं आहे. त्यामुळे ह्या मालिकेतील अनेक नवनवी वळणं प्रेक्षकांसमोर येत आहेत. 

 

 

आईने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकून घेतली. छोट्या पडद्यावर आई  साकारणारी  प्रसिध्द अभिनेत्री मधुराणी गोखले हिने अुंदती पडद्यावर जिवंत केली. 

 

 

अरुंधती फेम लाडकी अभिनेत्री मधुराणी गोखले हिनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आई कुठे काय करते मालिकेने 200 भागांचा टप्पा ओलांडल्याची आनंदवार्ता चाहत्यांशी शेअर केली. 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended