सुबोध भावेची निर्मिती असलेली मालिका 'शुभमंगल ऑनलाइन' करणार 50 भाग पू्र्ण

By  
on  

'शुभमंगल ऑनलाइन' ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय हा आकर्षणाचा भाग ठरतोय. नुकतीच ही मालिका आता 50 भाग पूर्ण करत आहे. या मालिकेचा 50 वा भाग प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडीयावर खास पोस्ट केल्या आहेत. अभिनेता सुबोध भावेच्या 'कान्हाज मॅजिक' या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.अभिनेता आणि या मालिकेचा निर्माता सुबोध भावेने देखील खास पोस्ट केली आहे.

सुबोध या पोस्टमध्ये लिहीतो की, "आमची निर्मिती संस्था.."कान्हाज मॅजिक" ची पहिली दैनंदिन मालिका "शुभमंगल ऑनलाइन" चा आज ५० वा भाग प्रदर्शित होतोय. या मालिकेशी संबंधित सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांचे मनःपूर्वक आभार. कलर्स मराठीने आम्हाला एक उत्तम गोष्ट मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे ही आभार. आणि भरभरून प्रतिसाद देणाऱ्या तुम्हा सर्व रसिकांचे आभार. बघत रहा सर्व कुटुंबाला आनंद देणारी मालिका."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

या मालिकेत अभिनेता सुयश टीळक आणि अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत आहेत. ऑनलाईन जुळलेलं नातं आणि ऑनलाईन लग्नाचा कॉन्सेप्ट घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

Read More
Tags
Loading...

Recommended