लतिकाच्या आयुष्यात पुन्हा होणार सज्जनरावांची एंट्री, पाहा व्हिडियो

By  
on  

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत अनेक रंजक ट्वीस्ट येताना दिसत आहेत. एकीकडे अभिमन्यू लतिका मनात प्रेम निर्माण करण्यासाठी धडपडतो आहे. तर दुसरीकडे लतिका अभ्याचं कोलमडलेलं आर्थिक गणित सावरु पाहते आहे. या सगळ्यात आता एका धमाल पात्राची एंट्री होताना दिसते आहे. लतिकाच्या प्रेमात वेडे झालेले सज्जनराव पुन्हा एकदा परत येताना दिसत आहेत. 

 

 

एकीकडे लतिका आणि अभ्याच्या नात्याचा गोंधळ, दुसरीकडे दौलत आणि कामिनीचा अभ्या आणि लतीला वेगळं करण्याचा डाव यात आता सज्जन रावांची भर पडली आहे. आता सज्जनरावांची एंट्री लतिकाच्या आयुष्यात काय गोंधळ उडवते ते लवकरच समजेल.

Read More
Tags
Loading...

Recommended