अनिकेत-मनूच्या सुखी संसारात पुन्हा वादळ, आई समोर येणार नोकरीचं सत्य

By  
on  

घरच्यांचा विरोध असूनही अनिकेत आणि मनूने संसाराचा श्री गणेशा केला आहे. घरच्यांनी जरी मनापासून त्यांच्या लग्नाला स्वीकारलं नसलं तरी अनिकेत मनूने आशा सोडली नाहीये. त्यांना विश्वास आहे हे चित्र लवकरच बदलणार आहे.पण मानसीसाठी ईर्षेला पेटलेला समर अनेकदा त्यांच्या गोड नात्यात मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत असतो. आताही त्याने तिच चाल खेळली आहे.

 

 

अनिकेतच्या आईसमोर त्याने नोकरीबाबतचं लपवलेलं सत्य समोर आलं आहे. अनिकेतने आईला ऑफिसर असल्याचं खोटं सांगितलं होतं. पण आता तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याचं आईसमोर आलं आहे. या फसवणुकीमुळे आईने अनिकेतशी नातं तोडण्याचं ठरवलं आहे. आता समरचा हा कुटिल डाव कितपत यशस्वी होते ते समजेलच.

Read More
Tags
Loading...

Recommended