‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील हा सीन वादाच्या भोव-यात

By  
on  

अनेकदा मालिकेमध्ये कळत नकळत आक्षेपार्ह सीन समोर येतात आणि मग सोशल मिडियावर वादाला जणू नवीन कारण मिळतं. आताही असंच झालं आहे. फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील एका सीनमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या मालिकेतील शुभमने भाग घेतलेल्या पाककला स्पर्धेतील एक स्पर्धक ‘सँडी’ हा समलैंगिक आहे.

 

 

स्पर्धा सुरु असताना सँडी आणि शुभमची आई म्हणजेच जीजी अक्का यांच्यामध्ये झालेल्या संवादावरुन LGBTQIA+ कम्युनिटीने आक्षेप घेतला आहे. जीजी आक्का सॅंडीला जीमला जाण्यास सांगतात. तसेच गळ्यातले, बांगड्या ही ज्वेलरी बहिण किंवा आईला देण्यास सांगतात. या दृश्यावर आक्षेप घेण्यात आल्याचं समजत आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended