पण ही पोस्ट ' संजू ' चं कौतुक करण्यासाठी नाहीये....... जयश्री फेम श्रुती अत्रेची पोस्ट चर्चेत

By  
on  

'राजा राणी ची ग जोडी' मालिकेत रणजीतच घरी लाल दिव्याची गाडी आणण्याचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संजुने घेतली. या प्रवासात संजुवर अनेक अडचणी आल्या आणि काही अडचणी राजश्रीने घडवून आणल्या तरी देखील संजुची जिद्द, निर्धार तितकाच खंबीर राहिला. 

 

 

संजूची ऑनस्क्रीन जाऊ जयश्रीने म्हणजेच श्रुती अत्रेने खास पोस्ट शेअर करत शिवानीचं कौतुक केलं आहे. श्रुती म्हणते, ‘आजच्या एपिसोड नंतर सगळे ' संजू ' चं भरभरून कौतुक करतील, करतायत. करायलाच हवं. एवढ्या कष्टातून, त्रासातून PSI झाली. पण ही पोस्ट ' संजू ' चं कौतुक करण्यासाठी नाहीये. ही पोस्ट ' शिवानी ' साठी आहे. संजू चे कष्ट अख्खा महाराष्ट्र बघतोय पण शिवानी ' संजू ' साकारण्यासाठी घेत असलेले कष्ट मी खूप जवळून बघतेय. दिवसातले १४-१५ तास न कंटाळता काम करणं आणि तरीसुद्धा २४ तास फ्रेश राहणं, आनंदी राहणं.. त्यात ही स्वतःची काळजी घेणं, एक routine ठरवून त्यात जिद्दीने सातत्य ठेवणं हे तुलाच जमू शकतं. ' संजू ' च्या भूमिकेत झालेला हा मोठा बदल खरतर खूप challenging आहे पण त्यातही पहिल्याच scene मध्ये खूप सहजता आणलीस. क्या बात है. ️
खरंच, तू ग्रेट आहेस.

Read More
Tags
Loading...

Recommended