सिध्दार्थ चांदेकर म्हणतो, "तुम्हा सगळ्यांचे आभार मानावे तितके कमीच..."

By  
on  

‘सांग तू आहेस का’ ही हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका अल्पावधितच रसिकांच्या पसंतीस उतरली. सुपरस्टार स्वराज त्याची दिवंगत पत्नी वैभवी आणि डॉक्टर वैभवी या तिघांभोवती गुंफलेली ही कथा सतत उत्कंठावर्धक वळण गाठते. त्यामुळेच प्रेक्षकांना उत्सुकतेपोटी मालिका पाहण्याचा मोह आवरता येत नाही. लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. ही गोष्टच त्यांना खिळवून ठेवतेय,

स्वराज साकारणारा अभिनेता सिध्दार्थ चांदेकर , अभिनेत्री शिवानी रंगोळे आणि अभिनेत्री सानिया चौधरी या कलाकारांची मालिकेतली केमिस्ट्री तुफान आहे. ऑफस्क्रीनसुध्दा हे तिघे एकमेकांचे चांगले मित्र ाहेत. नुकतंच या मालिकेने 150 एपिसोड्सचा पल्ला गाठलाय. 

‘सांग तू आहेस का’ या मालिकेचे 150 एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल सिध्दार्थ चांदेकरने एक खास पोस्ट शेअर केलीय. तो म्हणतो, "150 Episodes. Sang Tu Ahes Ka continues being in top 5 all over Maharashtra. तुम्हा सगळ्यांचे आभार मानावे तितके कमीच, लवकरच मुंबईत शूटिंग सुरु करू. 2 महिने घरापासून लांब राहून कंटाळा आलाय. तुमच्या प्रेमामुळे हे करणं शक्य झालं. आलोच आता.. तुम्ही रोज पाहत राहा...सांग तू आहेस का?"

 

Read More
Tags
Loading...

Recommended