अभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा ?

By  
on  

रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने नुकताच २५० भागांचा पल्ला गाठला. आता ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. एकीकडे अभ्याच्या मनात लतीबद्दल प्रेम आहे. पण आर्थिक संकट त्याला काहीसं मागे खेचत आहे. 

 

 

अभ्याने त्याला नोकरी नाही ही बाब घरच्यांपासून आणि लतिकापासून लपवून ठेवली आहे. पण आता आशुतोष ही बाब आप्पांसमोर आणतो आहे. यातच लतीच्या घरी अभ्या लतीच्या नात्याची कुणकुण लागली. तर एकीकडे अभिमन्यूचा आत्मविश्वास तोडण्यासाठी दौलतने दिलेली नोकरीची ऑफर त्याने नाकारली असून दौलतच्या आईच्या म्हणण्यावरुन नोकरीची ऑफर अभी स्वीकारेल ? याबद्दल अभी लतिकाला सांगू शकेल ?  लतिकाला हे कळल्यावर काय होईल ? हे समजण्यासाठी मात्र मालिकाच पाहावी लागेल .

Read More
Tags
Loading...

Recommended