पाहा Video : लग्नानंतरच्या नव्या नात्यासाठी अभिषेकची मानसिक तयारी नाही

By  
on  

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. अनेक नवनव्या उत्कंठावर्धक वळणांनी ही मालिका रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. अनघाला डावलून अंकितासोबत संसार थाटण्याचा अभिने घेतलेला निर्णय कोणालाच पसंत नाही. त्यालासुध्दा आता अंकितासोबत लग्न केल्याचा पश्चाताप हळूहळूव होतोय. तिचं घरातलं बेताल वागणं आणि तोंडाचा पट्टा सुरुच आहे. तिच्याशी बोलण्यात कोणालाच रस नाहीय. 
अंकिताने जीव देण्याचं खोटं नाटक करुन अभिला लग्नासाठी बळजबरी केल्याचा संशय यश आणि अभिला आहेच. त्यामुळे दोघंसुध्दा या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहेत. 


 

दरम्यान अंकिताच्या आईच्या गुडबुक्समध्ये येण्यासाठी आणि आपली नोकरी टिकविण्यासाठी अनिरुध्द अंकिता देशमुखांच्या घरात कशी सुखाने नांदेल, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतोय. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असल्याने त्याला त्यांची मर्जी राखणं महत्त्वाचं वाटतं. नुकतंच संपूर्ण देशमुख कुटुंब गावातील त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका रिसॉर्टवर चार दिवस निवांत घालवण्यासाठी पोहचले आहेत. तिथे अंकिताच्या आईने अंकिताच्या सांगण्यावरुनच तिच्या व अभिसाठी एक स्पेशल हनिमून रुम बुक केलीय. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अंकिता अभिला मोठ्या उत्साहात त्या सजवलेल्या हनिमून रुममध्ये घेऊन जाते, परंतु अभि तिला त्यासाठी स्पष्ट नकार देतो. तो यासाठी मानसिकरित्या तयार नसल्याचं तो आई-बाबांनाही सांगतो. अरुंधतीसुध्दा त्याच्या या निर्णयाला पाठिंबा देते. इतक्या विचित्र मानसिक परिस्थित लग्न झाल्यानंतर या सर्वांसाठी वेळ हा लागतोच हे तिचं म्हणणं आहे, आता या सर्व घडामोडींवर अंकिता आणि अनिरुध्द यांची प्रतिक्रीया काय असेल, पुढे नेमकं काय घडेल हे मालिकेत पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 
 

Read More
Tags
Loading...

Recommended