वटपोर्णिमेच्या दिवशी आसावरीसमोर येणार सोहम आणि सुझॅनच्या नात्याचं सत्य, पाहा Video

By  
on  

‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेमध्ये अनेक नवनवे ट्विस्ट येतायत. सुझॅननेसुध्दा सोहमसाठी वटलपोर्णिमेचा उपवास धरलाय. शुभ्रा आणि आसावरी जिथे पूजा करायला जातात. तिथेच सुझॅनसुध्दा वडाची पूजा करायला येते आणि या दोघी तिला अचूक हेरतात. आसावरी तिला हेसुध्दा समजावते, की वटपोर्णिमेची पूजा करण्याचा हक्क फक्त लग्न झालेल्या स्त्रियांनाच म्हणजे सुवासिनींनाच आहे.

वटपौर्णिमेच्या पूजेनंतर आसावरी शुभ्रासोबत घरी येते तर तिथे तिला सोहमच्या आणि सुझॅनच्या रासलीला पाहून धक्काच बसतो. शुभ्राला याची तशी ब-यापैकी कल्पना असतेच.  सोहम आणि सुझॅनचं सत्य आसावरीसमोर येतं, चिडून ती शुभ्राला सांगते आज पासून तू सोहमचं नाव लावायचं नाहीस. तसंच ती शुभ्राला म्हणते कि 'तुला असं का वाटलं कि मी तुझी सासू आहे, मी तुझी सासू नाही तर आई आहे, आणि तुझ्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध मी तुला नक्की न्याय मिळवून देईन.'

 

सोहमचं हे खरं रुप पाहिल्यानंतर शुभ्राला न्याय मिळवून देण्यासाठी आसावरी आणखी कोणती पाऊलं उचलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

Read More
Tags
Loading...

Recommended