'कोण होणार करोडपती'मुळे मयूरीला मिळाली कर्जमुक्ती!

By  
on  

माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही  उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. 

या आठवड्यात मुंबईची मयूरी वावदाने हॉट सीटवर खेळायला आली आहे. मयूरी एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. मयूरीच्या आईचं स्वप्न होत हॉट सीटवर खेळायला यायचं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. हॉट सीटवर बसण्याची आणि कुटुंबावरचं कर्ज फेडण्याची संधी आता मयूरीला मिळाली आहे. 

सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतंही करतात. मयूरीला तिच्या स्वप्नाविषयी विचारलं असता कुटुंबावर असलेलं कर्ज फेडता यावं, असं ती म्हणाली. 

आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत पोचलेली मयूरी तिच्या कुटुंबाला या खेळामुळे कर्जमुक्त करेल. पाहा, 'कोण होणार करोडपती', सोम.-शनि. रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended