Photos : राजा रानीचा कुल लूक पाहिलात का तुम्ही ?

By  
on  

 :राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना आखे यश मिळाले . रणजीत घरी परतणार आहे. मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे. पण आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. पुन्हाएकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही.

 

संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे. आणि याचसाठी राजा रानी कुल लुकमध्ये दिसणार आहेत. खास डेटसाठीची संजूची जय्यत तयारी देखील आहे. संजीवनी बुलेट चालवणार आहे. ही राजा रानीची डेट नक्कीच खास असेल. रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार आहे हे येत्या सोमवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा राजा रानीची गं जोडी मालिकेचा सोमवार विशेष भाग संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended