सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरीच्या घरी आली गौराई

By  
on  

गणपती हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनाने सारा आसमंत उजळून निघाला आहे. घरोघरी मोदकांचा दरवळ आणि आरतीचे सुमधून स्वर कानी पडत आहेत. गणेशोत्सवाचा हा जल्लोष स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतही पाहायला मिळणार आहे.

शिर्केपाटील कुटुंबात बाप्पाचं स्वागत तर जंगी झालंय आणि बाप्पाच्या पाठोपाठ गौराईंचं पण आगमन झालं आहे. शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येक सण अगदी जल्लोषात साजरा होतो. त्यामुळे बाप्पा आणि गौराईची साग्रसंगीत पूजाविधी पार पडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सुग्रास जेवणाचा आनंदही लुटला आहे.

एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह असताना मालिकेत नवा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. शालिनीचा खरा चेहरा संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. त्यामुळे माईसाहेब शालिनीला नेमका कसा धडा शिकवणार हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Read More
Tags
Loading...

Recommended