पाहा Video : अनिरुध्द आणि अरुंधतीमध्ये घटस्फोटानंतर वाढतेय जवळीक

By  
on  

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस रंजक होतेय. या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील शांतता मात्र पार हद्दपार झाली. ते हसतं-खेळतं घर पुरतं कोलमडलं.

कांचन यांची तब्येत ठीक नसल्याने अरुंधतीला घरात राहणं भाग पडलं. आता तर अप्पांनी त्यांचं राहतं घर अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या नावे केल्याने संजनाचा पुरता हिरमोड झाला आहे. आता अरुंधती तिच्या घरात कधीही येऊ शकते याची जाणीव झाल्याने संजनाचा रागाने तिळपापड झाला. कांचन आज्जीच्या तब्येतीसाठी अरुंधती आता समृध्दीमध्ये राहतेय. 

 आता गोकुळाष्टमी सणाच्या निमित्ताने सर्व एकत्र आले आहेत. जुनं सारं विसरु पाहत आहेत आणि आनंदाने आलेला क्षण जगणाचा मनमुराद प्रयत्न देशमुख कुटुंबिय करतायत. अनघा आणि अभिला एकत्र आणण्यासाठी घरच्यांनी जागरणाचा प्लॅन आखला आहे. 

 घटस्फोटानंतर अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यातील वाढती जवळीक संजनासाठी मात्र डोकेदुखी ठरू लागली आहे. गौरीकडे दम शेराजचा खेळ सुरु आहे. तिथे सर्वांमध्ये अनिरुध्द जाऊन पोहचतो आणि अरुंधती अभिनय करत असलेल्या सिनेमाचं नाव अचूक ओळखतो. दोघंही एकमेकांना आनंदाने अनपेक्षितपणे टाळ्या पिटतात.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अरुंधती आणि अनिरुद्ध पुन्हा एकत्र येणार का की संजना अरुंधतीला घराबाहेर काढण्यासाठी काही खेळी खेळणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल. 

Read More
Tags
Loading...

Recommended