‘अजूनही बरसात आहे’ मालिकेतील या व्यक्तिरेखेने घेतला आहे ब्रेक

By  
on  

अजूनही बरसात आहे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या  जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळताना दिसत आहे. आता मात्र या मालिकेत वेगळीच बातमी ऐकायला मिळते आहे. या मालिकेतील अभिनेत्री लवकरच एका नव्या दमाच्या मालिकेतून आणि एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे अजूनही बरसात आहे या मालिकेत त्यांनी ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे.

 

 

 

या अभिनेत्रीचे नाव आहे उमा सरदेशमुख. उमा सरदेशमुख यांनी अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजच्या आईची भूमिका निभावली होती. सुरुवातीला नकारात्मक भूमिकेत दिसणारी व्यक्तिरेखा आता सकारात्मक दिसते आहे. उमा सरदेशमुख ह्या सन मराठी ह्या नव्याने सुरू झालेल्या वाहिनीवरील कन्यादान या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या पोस्टमध्ये उमा म्हणतात, ‘आजपर्यंत माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलंत, आता येतीये आणखी एका नवीन भूमिकेत...आशालता....एक वेगळी भूमिका एक वेगळा अनुभव. "कन्यादान" @sunmarathi वर आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता नक्की बघा’

Read More
Tags
Loading...

Recommended