‘जीव माझा गुंतला’ मालिकेत अंतराच्या या सोबतीची होणार पुर्नभेट

By  
on  

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेमध्ये अंतरा आणि “हमसफर”चं नातं खूप खास आहे. आजवर तिच्या आयुष्यात ज्या अडचणी आल्या, तिच्या मनात ज्या भावना होत्या त्या सगळ्या तिने हमसफरला सांगितल्या. जे कठीण प्रसंगी आले त्यावेळेस हमसफरची साथ तिला लाभली. हमसफर ही फक्त एक रिक्षा नसून अंतराच्या खूप जवळची, तिच्या कुटुंबातील एक व्यक्ति म्हणूनचं तिने तिच्याकडे आजवर पहिलं.

पण, खानविलकरांच्या घरी जेव्हा अंतरा सून म्हणून गेली तेव्हा कुठेतरी प्रेक्षकांना वाटलं आता हमसफर आणि अंतराची साथ तुटणार. परंतु तसं नसून आता पुन्हा एकदा अंतराला हमसफरची साथ मिळणार आहे. शितोळे परिवाराला पैशांची कमतरता भासू नये, आई वडिलांना कुठलाही तरस होऊ नये म्हणून अंतरा रिक्षा पुन्हा एकदा चालविण्याचा निर्णय घेणार आहे.

 

लग्न झाल्यावर आपल्या माहेरी हातभार लावावा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे प्रत्येक मुलीला वाटतं असते आणि तशीच इच्छा आपल्या अंतराची देखील आहे. पण आता तिचा हा निर्णय कुठलं नवं संकट तिच्या पुढे घेऊन येणार ? खानविलकर कुटुंबाची साथ अंतराला मिळेल का ? ती कसा यातून कसा मार्ग काढणार ? चित्रा यामध्ये कुठली नवी खेळी खेळून जाणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
 
अंतरा रिक्षा चालविण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ती सुवासिनी यांना सांगण्याचा प्रयत्न देखील करते आणि ती तसं सांगते देखील. पण, तसं करून सुध्दा त्या दोघींमध्ये गैरसमज का होतो ? सुवासिनी आणि अंतरा मध्ये गैरसमज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मल्हारने देखील अंतराला अजून बायको म्हणून स्वीकारले नाहीये. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आता हे नवं संकट तिच्यासमोर उभे ठाकणार आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended