‘देवमाणूस’ मालिकेतील हा कलाकार या अभिनेत्रीसोबत आहे नात्यात

By  
on  

देवमाणूस मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील काही कलाकारांप्रमाणेच विजय शिंदे ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एकनाथ गीतेने ही व्यक्तिरेखा साकारली होती. एकनाथने नुकतंच नात्यात असल्याची कबुली दिली आहे. 

 

 

एकनाथ गीते याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याच्यासोबत अभिनेत्री त्रिशा कमलाकर दिसत आहे. यात त्याने तिच्यासोबत २०१८ मधील आणि २०२१ मधील असे दोन फोटो शेअर करत एक रिल व्हिडीओ तयार केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. आता देवमाणूस या मालिकेच्या दुस-या सीझनमध्येही एकनाथ यांची भूमिका असणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended