महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची रंगत वाढवणार टीम 'Pet पुराण'

By  
on  

  संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता हास्यपंचमी साजरी करतो आहे. आठवड्यातले पाचही दिवस हा कार्यक्रम हास्यरसिकांना बघायला मिळतो आहे. ह्या आठवड्यात रसिकांचं मनोरंजन वाढणार आहे. कारण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर SonyLivवरील 'Pet पुराण' या सीरिजचा  चमू येणार आहे.

अभिनेता ललित प्रभाकर आणि ऋषी मनोहर यांचं स्कीट रसिकांना बघायला मिळणार आहे. 'Pet पुराण' ह्या  सीरिजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आणि हे असं असताना या  सीरिजचा  चमू हास्यजत्रेत येणं ही सईसाठी आणि हास्यरसिकांसाठी पर्वणी असेल. हा विशेष भाग हास्यरसिकांना शुक्रवारी पाहता येणार आहे. सीरिजचा विषय वेगळा पण प्रेक्षकांना आवडणारा असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

मालिकेचा संपूर्ण  चमू काय धम्माल करणार, ललित आणि ऋषी यांच्याकडून लोकांना काय बघायला मिळणार;हे जाणून घेण्यासाठी हास्यजत्रा पाहत राहा. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'., सोम.-शुक्र., रात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर!

 

Read More
Tags
Loading...

Recommended