'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडे यांची पहिली कमाई!
'कोण होणार करोडपती'चा मंच हा अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरला आहे. कोणाचं या मंचावर येण्याचं स्वप्न पूर्ण झालं, कोणाची सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली तर कोणी रक्कम जिंकून स्वतःला सिद्ध केलं. बदलापूरच्या भारती यांची गोष्ट अगदी अशीच. स्वप्नपूर्तीच्या या मंचावर त्या आयुष्यातली पहिली कमाई करणार आहेत. ५० लाखांचा प्रश्न त्या खेळणार असून ज्ञानाच्या साथीनं सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या खेळातून दाखवून दिलं आहे. आयुष्यातली पहिली कमाई ही सगळ्यांसाठीच खास गोष्ट असते. आणि ती कमाई थेट लाखांतली असेल तर ती गोष्ट मोठी असते. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती करोडपती होणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात आत्तापर्यंत विविध क्षेत्रांतील आणि वयोगटांतील स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळाली आहे. बदलापूर इथल्या भारती दबडे या गृहिणी आहेत. 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात सहभागी होऊन त्या त्यांची आयुष्यातली पहिली कमाई मिळवणार असल्याने हा भाग त्यांच्या स्वतःसाठी आणि प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे. गृहिणी ही सर्वसामान्य असते असा एक समज असतो, पण एक गृहिणी जेव्हा ५० लाखांपर्यंत पोचते, तेव्हा ती तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करते. भारती दबडे यांच्या उत्कृष्ट खेळाने, 'गृहिणीनं ठरवलं तर ती काहीही करू शकते', हे सिद्ध झालंय. या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी ५० लाखांचा प्रश्न गाठला आहे.
भारती करोडपती होणार का? त्यांची पहिली कमाई लाखांत होणार की या पर्वाच्या पहिल्या करोडपती म्हणून त्या स्वतःचं नाव कोरणार हे बघण्यासाठी,
पाहा, 'कोण होणार करोडपती', गुरुवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.