९५ वर्षांच्या भक्ताची “योगयोगेश्वर जय शंकर” मालिकेच्या सेटला भेट !

By  
on  

 कलर्स मराठी वर नवीनच सुरू असलेली योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेद्वारे सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे. श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे, त्यापैकी एक भक्त म्हणजे श्री रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका) सोलापुर यांना वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत त्यांना शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात लाभला. महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे आयुष्य भक्तिमय झाले १९४७ साली धनकवडी येथे महाराजांनी समाधी घेतली.  त्यावेळी पेंटर काकांचे वय  वीस वर्ष होते. आज पेंटर काकांचे वय ९५ वर्ष असून  ते “योगयोगेश्वर जय शंकर” ही मालिका कलर्स मराठी वर प्रसारित होत आहे, हे समजताच त्यांना अत्यानंद झाला आणि बालशंकरच्या भूमिकेत आरुषला पाहून त्यांना गहिवरून आले. मालिकेतील बाल शंकरला पाहून त्यांना पुन्हा एकदा सद्गुरू श्री शंकर महाराज यांची प्रत्यक्ष  भेटीची ओढ लागली. आणि आज वयाने  ९५ वर्षाचे असलेले काका ताबडतोब मुलगा विजूदादा कडलास्कर,यांच्या सह सोलापूर वरून कलर्स मराठी च्या योगयोगेश्वर जय शंकर मालिकेच्या नाशिक येथील  सेटवर बालशंकरला भेटण्यासाठी आले.

 

 

काकांच्या ह्या भेटीतून त्यांचे शंकर महाराजांवर असलेले अफाट प्रेम दिसून आले. काकांच्या या गुरु भेटीच्या ओढीतून ह्या मालिकेचे यश आपल्याला दिसून येते मालिकेच्या सेटवर पेंटर काकांनी बाल शंकरला पाहताच क्षणी मिठीत घेतले आणि त्यांनी बाल शंकरने 'आजोबा' म्हणून हाक मारून कवेत घेतले आणि महाराजांचा पुन्हा एकदा सहवास लाभला असे उद्गार काढले त्यावेळी ते  गहिवरून आले  पेंटर काकांनी महाराजांविषयी प्रत्यक्ष भेटी चे काही अनुभव सर्वांना सांगितले विजूदादा यांनी ही शंकर महाराज आणि भस्मे काका ,मधुबुवा, जक्कल काका, प्रधान , आशर ,गिरमे काका यांच्या आणि  पेंटर काकांच्या यांच्या समोर घडलेल्या महाराजांच्या  चमत्कारा तुन घडलेल्या आध्यत्मिक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे  काका आणि बालशंकर ही भेट पाहून सेट वरील सर्व कलाकार, आणि संपूर्ण टीम ला विलक्षण आनंद झाला.सेट वरील वातावरण भक्तीमय होऊन गेले यातूनच सद्गुरु श्री शंकर महाराजांचे त्यांच्या भक्तांवर असलेले अतोनात प्रेम,आणि कृपादृष्टी यातूनच दिसून येते हेच कलर्स मराठी वरील योग योगेश्वर जय शंकर या मालिकेचे यश आहे.

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended