माझी तुझी रेशीमगाठ' मलिकेत नेहाच्या नवऱ्याची एंट्री! हा अभिनेता हा अभिनेता साकारतोय भूमिका

By  
on  

झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेत नुकतंच यश-नेहा लग्नबंधनात अडकले असून त्यांचा सुखी संसार सुरू झाला आहे. अशातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. 

मलिकेत नेहाच्या आधीच्या नवऱ्याची एंट्री होणार आहे. परीच्या जन्मापूर्वीचा नेहाचा नवरा तिला एकटं सोडून गेला होता. त्यानंतर नेहाने परीला एकटीने सांभाळलं. आता नेहा आणि यशाच्या लग्नामुळे हे कुटुंब तिघांचं होणार होतं, पण तेवढ्यात नेहाच्या आधीच्या नवऱ्याच्या एंट्री होणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत असून या प्रोमोमध्ये नेहा आणि यशच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये छापून येते. ही बातमी तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचते आणि तो तिच्या लग्नात अडथळा आणताना दिसणार आहे. नेहाच्या नवऱ्याची भूमिका निखिल राजशिर्के हा अभिनेता साकारत आहे. निखिलने नाटक आणि मालिकांमधून दमदार अभिनय केला आहे. याआधी तो 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दिसला होता. त्यामुळे मालिका आणखी रंजक वळणावर येणार असून नेहाच्या नवऱ्याच्या एंट्रीने मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended