तू तेव्हा तशी! 'हम बायका बायका रहता है ना इधर..' व्हिडीओ पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

By  
on  

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेम कधीही आणि कुठल्याही वयात होतं. महत्त्वाचं तर ते तेव्हा असतं जेव्हा हरवलेलं प्रेम पुन्हा गवसतं. याच स्टोरी लाईनवर आधारित छोट्या पडद्यावरची अनामिका आणि सौरभची हटके लव्ह-स्टोरी 'तू तेव्हा तशी' ही मालिका प्रचंड गाजतेय. एका ऐन तारुण्यात आलेल्या मुलीची आई  अनामिकाआणि अविवाहित असलेला सौरभ पटवर्धन  यांची प्रेमकहाणी तुफान लोकप्रिय होतेय. अनामिकाच्या भूमिकेतील शिल्पा तुळसकर आणि पट्या म्हणजेच सौरभ पटवर्धन प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवतायत. या मुख्य व्यक्तिरेखांबरोबरच सच्चू, माई मावशी, रमा आजी, निल, राधा आणि वल्ली या सर्वांनीच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 

मालिकेत अनामिकाची आई साकारणाऱ्या सुहास जोशींचा एक विडिओ सध्या बराच व्हायरल होताना दिसत आहे. पट्या रूप बदलून अनामिकाला भेटायला लॉंड्रीवाला भैय्या बनून येतो असा एक प्रसंग मालिकेत दाखवला आहे. त्यानंतर त्याच्याशी भन्नाट हिंदीत बोलतानाचा एक व्हिडीओ झी मराठीच्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाला . तसाच अजून एक विडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यात सुहास जोशी या एकदम कडक स्टाईलमध्ये मराठी मिश्रित हिंदी बोलताना दिसत आहेत. त्यांचं हे हिंदी ऐकून तुम्हाला हसून हसून पोटात दुखल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की! 

 

 

'तू तेव्हा तशी'  मालिकेतील रमा आई हे पात्र खुपच गोड आहे. ज्येष्ठअभिनेत्री सुहास जोशींनी  या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयातून चार चॉंद लावले आहेत. लेकीच्या पाठीशी खंबीर उभे राहतात तशा या सासूबाई आपल्या सूनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. आपल्या मुलाने तिच्या आयुष्याची केलेली राखरांगोळी पुसून टाकण्यासाठी त्यांनी कंबर कसलीय, तिचं सौरभ पटवर्धन सारख्या सज्जन मुलासोबत दुसरं लग्न लावण्यासाठी त्या हिरहिरीने पुढाकार घेताना मालिकेत पाहायला मिळतात.

Read More
Tags
Loading...

Recommended