Video : 'देवमाणूस' पुन्हा येतोय, आता 'हिंदीत' हैवान बनतोय!

By  
on  

देवमाणूस या रहस्यमय थरारक  मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला . या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या . डॉ. अजितकुमार देव, नटवर सिंग उर्फ देवीसिंगच्या व्यक्तिरेखेतील किरण गायकवाडसह टोण्या, सरु आजी, डिंपल, बाबूदादा, मंगलताई, बज्या, नाम्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये अखेर देवमाणूस उर्फ देवी सिंगचा पोलिसांनी खेळ खल्लास करत त्याला फासावर लटकवलं. मालिका समाप्त झाली.  ‘देवमाणूस’ ही मालिका आता हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हिंदी भाषिक प्रेक्षकांनासुद्धा मराठीमधील ही बहुचर्चित मालिका पाहता येईल. या मालिकेचा हिंदीमधील प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अँड टीव्ही वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘देवमाणूस’मध्ये मुख्य भूमिका साकारणार अभिनेता किरण गायकवाडच हिंदी मालिकेमध्येही काम करताना दिसेल.

Read More
Tags
Loading...

Recommended