शंकर महाराजांच्या आयुष्यात सुरु होणार नवा अध्याय; मालिका रंजक वळणावर

By  
on  

या मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार हा आध्यात्मिक टप्पा सध्या चरणसीमेवर असून चिमणाजी – पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा क्षण निर्माण होणे, प्रेक्षकांना भावुक करणार आहे.

शंकर या दांपत्याला सोडून निघाला असला तरी त्याने आई पार्वतीची इच्छा पूर्ण करून तिला संततीसुख प्राप्त होईल याची दैवी रचना केली आहे, त्यानुसार पार्वतीला अपत्यप्राप्तीचे वेध लागले असून पार्वतीचे डोहाळे जेवण, शंकरच्या भावंडांचा जन्म असा रंजक कथाभाग मालिकेत सादर होणार आहे.

आई आणि मुलाच्या अनोख्या नात्याचा हा अनुपम सोहळा उमा पेंढारकर आणि आरुष बेडेकर यांनी विलक्षण मायेने संस्मरणीय केला आहे.

'योग योगेश्वर जय शंकर' ही मालिका शंकर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. या मालिकेत सध्या शंकर महाराजांचं बालपण दाखवलं जात आहे. अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झाली आहे.

बघत राहा योगयोगेश्वर जय शंकर’ सोम ते शनि संध्याकाळी ७.०० वा कलर्स मराठीवर

Read More
Tags
Loading...

Recommended